PM Matru Vandana yojana 2.0 पंतप्रधान मातृ वंदना योजना ही गर्भवती महिलांसाठी अतिशय आर्थिक फायदेशीर योजना आहे या योजनेच्या माध्यमातून ज्या महिला गर्भवती असतील त्यांना मातृ वंदना या योजनेमार्फत पाच हजार रुपये हप्ता मिळू शकतो.
या योजनेसाठी ज्या काही पात्रता असतील ती सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे तर ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी माहिती व्यवस्थित वाचा आणि मग अर्ज करू शकता.
आता पंतप्रधान मातृ वंदना योजना ही गर्भवती महिलांसाठी फायदे ची योजना आहे. या योजनेचे पैसे महिलांना तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे त्याबाबतच सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
PM Matru Vandana yojana 2.0
किती पैसे आणि किती टप्प्यात हे पैसे मिळतील ?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) भारत सरकारने महिलांच्या तसेच बाल विकास कल्याणासाठी ही योजना प्रत्यक्षात राबवण्यात आलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट हेच आहे की सर्व गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा. महिलांच्या विकासासाठी ही आर्थिक मदत भारत सरकारने जारी केलेली आहे त्यामुळे सर्व गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे भारत सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.
पैसे किती मिळतील?
या योजनेचे पैसे 5000 रुपये ठेवण्यात आलेले होते पण या योजनेचा मातृ वंदना योजना 2.0 या योजनेअंतर्गत म्हणजे या योजनेत जो नवीन बदल केलेला आहे त्यात सहा हजार रुपये करण्यात आलेले आहे हे पैसे तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहेत.
- पहिला हप्ता
हा हप्ता मुलाच्या जन्माच्या एक महिना आधी मिळणार आहे
- दुसरा हप्ता
हा हप्ता मुलाच्या जन्मानंतर एक महिन्यानंतर सहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
- तिसरा हप्ता
हा जो शेवटचा हप्ता आहे ज्यावेळेस मुलगा लसीकरणासाठी त्या वेळेला हा हप्ता मुलाचा आईच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही काही माहिती होती . जे या योजनेचे महत्त्वाचे टप्पे होते.
PM Matru Vandana yojana 2.0
मातृ वंदना योजनेचे मुख्य उद्दिष्टे
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजेच भारत सरकारने ज्या मागासवर्गीय महिला असतात अशा महिलांना आर्थिक मदत म्हणून ही योजना राबविण्यात आलेली आहे. ही योजना 2019 20 पासून राबविण्यात आलेली आहे तेव्हा या योजनेमध्ये काही मोजकच प्रवर्गातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. पण आता,
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 या योजनेत काही बदल करून सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर हाच एक मोठा बदल या योजनेत केलेला आहे त्यानंतर दुसरा एक बदल केलेला आहे तो म्हणजे सुरुवातीला पाच हजार रुपये मिळत होते ते आता सहा हजार रुपये मिळणार आहेत ही योजना भारत सरकारने सर्व राज्यांसाठी अवलंबवली आहे त्यामुळे सर्व राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे महिलांना गर्भधारणेच्या काळात जे काही आर्थिक मदतीची गरज असते ती या योजनेतून मिळणार आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजना
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- आधारकार्ड
- बँक पासबूक
- पती आणि पत्नीचे संमती पत्र
- mcp कार्ड (माता संरक्षण कार्ड )
- पतीचे आधारकार्ड
- मोबाइल नंबर
हे काही महत्वाचे कागदपत्रांची आवश्यकता आहे. महत्त्वाचं म्हणजे जे एम सी पी कार्ड आहे ते सर्व माता कडे उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यावरच तुम्हाला पुढील दोन हप्ते प्राप्त होणार आहेत म्हणजेच दुसरा हप्ता हा मुलाचा जन्माच्या नंतर मिळणारा सुद्धा मुळे हे कार्ड तिथे अतिशय महत्त्वाचे आहे त्यावर तुमचे दुसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होतील तसेच दुसऱ्या नंतर तिसऱ्या हप्त्याला देखील या कार्डाची गरज आहे कारण एम सी पी कार्ड हे एक परवा म्हणून काम करते त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी हे कार्ड अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे हे कार्ड सर्व मातांनी जपून ठेवावे त्याबरोबरच इतर काही माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती पण पूर्ण पहा.
अर्ज करण्याची प्रक्रिया ;
मातृ वंदना योजना या योजनेचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे आता तो फॉर्म कसा भरायचा याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता व या योजनेसाठी अर्ज करू शकता.
तरी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक अर्ज प्रत तुम्हाला आपल्या जवळच्या अंगणवाडी शिक्षिकेकडून हा अर्ज प्राप्त करा त्यानंतर या अर्जावर जेवढे काही माहिती दिलेली आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजना
ती माहिती संपूर्ण आधी वाचा त्यानंतरच तुम्ही माहिती भरू शकता अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत या अर्जासोबत लावून तुम्ही हा अर्ज अंगणवाडी शिक्षिके कडे जमा करू शकता व या योजनेची माहिती शिक्षकेकडून तुम्ही जाणून घेऊ शकता तसेच पैसे कधी व किती जमा होतील याबाबत देखील तुम्ही अंगणवाडी शिक्षकाकडून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता
प्रधानमंत्री मातृ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला भारत देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे. आणि ही योजना फक्त गर्भवती महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना सुरुवातीला सांगण्यात आले होते की ही योजना फक्त ग्रामीण भागाकडे अवलंबवली जाणार आहे पण पी एम एम पी 2.0 योजनेतील बदल करून ही योजना भारत देशातील प्रत्येक गर्भवती महिलेला लागू पडणार आहे त्यामुळे सर्वच गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेतील.
आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेतील मिळणारे पैसे खात्यात जमा झाले की नाही कसे तपासयचे
ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही पात्र ठरतात त्यानंतर पात्र ठरवून देखील तुमच्या खात्यात पैसे येत नसतील तर तुम्ही अंगणवाडी शिक्षकाकडे याबाबत चौकशी करू शकता. आणि हे जे तीन टप्प्यात येणारे पैसे आहेत ते वेळच्या वेळी तुमच्या खात्यात जमा होतात थोडाफार मागेपुढे वेळ होत असेल पण पैसे हमखास येतात त्यामुळे त्यांनी चौकशी करू शकता जर खात्यात पैसे येत नसतील तर,
इतर काही माहिती;
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेतील इतर काही माहिती पाहायचा विचार झाला तर ही योजना जवळपास पाच ते सहा वर्ष आधीच अस्तित्वात आहे पण त्यामध्ये काही बदल करून ही योजना नव्याने 2023 24 आणि 25 या वर्षांमध्ये नवीन बदल झालेला आहे हा बदल अतिशय महत्त्वाचा यामध्ये रक्कम देखील वाढवण्यात आलेले आहे आणि जे काही टप्पे आहेत ते टप्पे देखील जवळपास लागोपाठच करण्यात आलेले आहेत.
या योजनेचा लाभ घेताना महिलांना जेवढ्या काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे त्या कागदपत्रे आधीच जमा करून ठेवावे कारण नंतर धावपळ होत नाही आणि जे काही एम सी पी कार्ड आहे ते देखील लवकरात लवकर काढून घ्यावे हे कार्ड जर काढायचे असेल तर तुम्ही अंगणवाडी शिक्षिके कडे या कार्डासाठी अर्ज करू शकता व हे कार्ड घेऊ शकता.
वरील सांगितल्याप्रमाणेच फक्त भारत देशातीलच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच या योजनांचा लाभ हा सर्व प्रवर्गातील महिलांना मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस गर्भवती महिलांना या मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यासाठी गर्भवती महिलेचे वय हे 21 वर्षापेक्षा जास्त आसणे आवश्यक आहे. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे कारण 21 पेक्षा वय कमी असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेची वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.